ये देख मां पचास तोला… माजी गोलंदाज प्रवीण कुमारची संजू बाबाला टशन

1914

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत बघितल्यावर हसुन हसुन तुमची पुरती वाट लागणार आहे. कारण फोटोत प्रवीण गोलंदाजाच्या नाही तर चक्क टपोरीच्या लूकमध्ये दिसतोय. फोटोतल्या दाढी वाढवलेल्या प्रवीणला बघून तुम्हांला नक्कीच ‘वास्तव’ चित्रपटातील संजू बाबाची आठवण येणार आहे. कारण प्रवीणने गळ्यात संजू बाबासारखीच सोन्याची जाडजूड चैन घातली असून त्याखाली संजू बाबा… ये देख मां 50 तोला असा डायलॉगही प्रवीणने पोस्ट केला आहे.

1999 साली संजय दत्तचा ‘वास्तव’ हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला होता. त्यातही त्यातील संजय दत्तची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. प्रवीण कुमारही संजय दत्तचा चाहता असल्याने त्याने या पोस्टमध्ये त्याच्याच गेटअपमधला फोटो पोस्ट करत  त्याखाली वास्तव चित्रपटातील …ये देख मां 50 तोला हा डायलॉग पोस्ट केला आहे.

प्रवीण कुमारला सोन्याची चैन घालण्याची आवड आहे. क्रिकेट खेळतानाही तो महागडी चैन घालायचा. 2014 साली नागपूर येथे विजय हजारे चषक सामन्या दरम्यान प्रवीण यांची सोन्याची चैन ड्रेसिंग रुममधून चोरीला गेली होती. 250 ग्रॅम वजनाच्या चैनची किंमत 7 लाख रुपये होती.


View this post on Instagram

When I took sanju baba too seriously @duttsanjay “yeh dekh maa 50 tola”

A post shared by Praveen Kumar(PK) (@praveenkumarofficial) on

आपली प्रतिक्रिया द्या