नांदेडमध्ये तो आला… कोसळला… दाणादाण उडवून गेला

56
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

ज्याची सारे आतुरतेनं वाट पाहात आहे त्या वरुणराजानं आपण येत असल्याचा पहिला संदेश धाडला आहे. नांदेड शहरात काल रात्री १० ते मध्यरात्री १ पर्यंत मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडाली.

पावसाच्या आगमनानं आंनद झाला असला तरी अनेक रस्त्यावर दोन फूट पाणी साचले होते. नाले सफाईचे नियोजन कागदावरच राहिल्याने शहरवासीयांचे हाल सुरू झाले आहेत. दरम्यान, अर्धापूर मालेगाव, मुखेड, कहाळा, मारतळा, सोनखेड लोहा मुखेड परिसरात ही हलका ते मध्यम पाऊस झाला.

आपली प्रतिक्रिया द्या