हत्तिणीच्या तोंडातच फटाक्यांचा स्फोट झाला, जबडा तुटल्याने मृत्यू होईपर्यंत होती उपाशी

1313

5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला होता. याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे. सोशल मीडियावर या प्रकरणी 2 जणांना अटक केल्याची चर्चा आहे, मात्र त्याला कोणीही अधिकृरित्या दुजोरा दिलेला नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दोषींविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

ही बातमी वाचलीत का ? – केरळला लाज वाटायला पाहिजे! मराठी अभिनेत्री संतापली

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी या हत्तिणीच्या मृत्यूनंतर केंद्रातील मंत्र्यांसह काही जण केरळचे नाव या प्रकरणावरून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि वन विभागाने घटनास्थळाला भेट दिली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे अशी माहिती विजयन यांनी दिली. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Viral Video – नदीत माणूस बुडताना दिसला, पाहा हत्तीच्या पिल्लाने काय केलं

गर्भवती हत्तिणीला काही नतद्रष्टांनी फटाके भरलेले अननस खायला दिले होते. हे अननस खाल्ल्यानंतर वेदनेने तडफडून त्या हत्तिणीचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी, कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आहे. 27 मे रोजी या हत्तिणीचा मृत्यू झाला होता, त्यानंतरविशेष तपास पथक स्थापन करून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. आतातपर्यंत या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य 2 संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी या घटनेनंतर ट्विटरवरून त्यांचा संताप व्यक्त केला. केरळ आणि इतर राज्यांमध्ये या घटनेविरोधात हजारों याचिका दाखल करण्यात आली आहे, यावरून लोकांमध्ये किती संताप आहे हे दिसून येतंय असं त्यांनी म्हटलंय. समाजमाध्यमांद्वारेही अनेकजण त्यांचा राग व्यक्त करत आहेत आणि दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी करत आहेत. change.org या वेबसाईटवर 24 तासात 927 लोकांनी या घटनेचा निषेध करत याचिका दाखल केली आहे. 13 लाख लोकांनी या याचिकांना समर्थन दिले आहे.

हत्तिणीच्या पोस्टमॉर्टेममध्ये कळाले की फटाक्यांचा तोंडामध्ये स्फोट झाल्याने हत्तिणीचा जबडा तुटला होता आणि तिला काहीही खाता येत नव्हतं. घाबरलेली हत्तीण वेलियार नदीत जाऊन थांबली होती. पाण्यात बुडल्याने तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी गेलं आणि ती निकामी झाली. यामुळे हत्तिणीचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टेममध्ये कळालं. ही हत्तीण 14 दिवस उपाशी होती. खायला मिळेल या आशेवर तिने गावात अनेकदा फेऱ्या मारल्या मात्र तिला खायला काहीही मिळालं नाही. भयंकर वंदना होत असताना आणि भूक लागलेली असतानाही या हत्तिणीने कोणालाही इजा पोहचवली नाही किंवा कोणाच्या घराचेही नुकसान केले नाही. यावरून ती हत्तीण किती चांगली होती याचा अंदाज येऊ शकतो असे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या