
नगरमध्ये लोणी-हनुमंतगाव रस्त्यावर बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
हनुमंतगाव येथील बाबासाहेब रघुनाथ ब्राह्मणे यांच्या गट क्र.199 मध्ये साडेतीन वर्ष वयाचा मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी वन अधिकार्यांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी हजर झाले. लोणीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.खपके यांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला. मृत मादीच्या पोटात पूर्ण वाढ झालेले बछडे होते. त्यानंतर जागेवरच बिबट्याला अग्नी देण्यात आला.





























































