
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना हिंदुस्थानातून परत पाठवण्याची तयारी केली जात आहे. ऑगस्ट 2024 मध्ये सत्ता गमावल्यानंतर शेख हसीना यांनी हिंदुस्थानात आश्रय घेतला होता. परंतु, आता शेख हसीना यांनी मायदेशी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने त्यांना परत पाठवण्याची तयारी पेंद्र सरकारकडून केली जात आहे.
जुलै 2024 मध्ये बांगलादेशात जे आंदोलन झाले होते त्या आंदोलनात आंदोलकांवरील करण्यात आलेल्या कारवाईशी संबंधित प्रकरणात बांगलादेशच्या कोर्टाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे त्यांना परत बांगलादेशात पाठवण्याचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. तसेच शेख हसीना यांचा हिंदुस्थानातील मुक्काम वाढल्याने पेंद्रातील मोदी सरकारसाठी हा विषय अडचणीचा ठरत असून हिंदुस्थान आणि बांगलादेश या दोन देशांतील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. शेख हसीना यांचे हिंदुस्थानातील वास्तव्य वाढल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही टीका होत आहे. हसीना यांनी 9 नोव्हेंबरला नव्या पासपोर्टसाठी बांगलादेश सरकारकडे अर्ज केला होता.
हिंदुस्थानच्या बांगलादेशसमोर दोन अटी
शेख हसीना यांच्या परतीसाठी हिंदुस्थानने बांगलादेशसमोर दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे बांगलादेशच्या सैन्याने स्वतः हिंदुस्थानात येऊन हसीना यांना आपल्यासोबत परत घेऊन जावे आणि दुसरी अट म्हणजे बांगलादेशातील एका न्यायालयाने हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात शेख हसीना यांना अपील करण्याची संधी मिळावी, तसेच जुलै 2024 मध्ये झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आरोपांवर नव्याने सुनावणी केली जावी.






















































