
हिंदुस्थानी सेना दलांच्या कमांडर-इन-चीफ असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ‘राफेल’ या लढाऊ विमानातून उड्डाण केले. हरयाणातील अंबाला हवाई तळावरून त्यांनी उड्डाण भरले. ग्रुप कॅप्टन अमित गहानी यांनी राष्ट्रपतींचे सारथ्य केले. या वेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी हिंदुस्थानच्या पहिल्या आणि एकमेव फायटर प्लेन पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह यांच्यासोबत फोटोही काढले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये याच विमानाचा सहभाग होता. हे विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.



























































