
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर गेले आहेत. मोदी हे दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर गेले असून ते 16 आणि 17 नोव्हेंबरला मनीलात राहणार आहेत. या ठिकाणी ते एशियन-हिंदुस्थान आणि इस्ट आशिया समीटमध्ये सहभागी होणार आहेत.
मोदी यांनी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरला उज्बेकिस्तान आणि किर्गिजस्तानचा दौरा केला होता. त्याआधी 6 जुलै ते 11 जुलै 2026 ला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला होता. 13 जून ते 18 जूनला फ्रान्स आणि स्लोव्हिकियाचा दौरा केला होता. मे महिन्यात 15 ते 20 या दरम्यान यूएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा केला होता.

























































