पृथ्वी शॉच्या पुनरागमनाचे ठरले, 17 नोव्हेंबरला क्रिकेट मैदानावर परतणार

654

मुंबईचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा मुहूर्त ठरला आहे. अजाणतेपणे सर्दीच्या औषधातून उत्तेजक द्रव्यांचं सेवन केल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगत असलेल्या पृथ्वीची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात निवड झाली आहे.त्याच्यावरील सहा महिन्यांची बंदी १६ नोव्हेंबरला मध्यरात्री संपत आहे. अखेरच्या दोन साखळी सामन्यांसाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र पृथ्वी शॉ आता १७ नोव्हेंबरच्या मुंबई विरुद्ध आसाम या सामन्यांत खेळू शकणार आहे.

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठीच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी असा असेल मुंबईचा संघ –
सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ (१७ नोव्हेंबरपासून खेळण्यास पात्र), आदित्य तरे, जय बिस्ता, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, शम्स मुलानी, ध्रुवील मटकर, शार्दुल ठाकूर, नायक, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि एकनाथ केरकर

आपली प्रतिक्रिया द्या