
सामना ऑनलाईन, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिच्या सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्ट, कमेंटला चाहते भरभरून लाइक्स देतात. प्रियाही नेहमी चाहत्यांचे मनापासून आभार मानते. पण सध्या ती एका फोटोमुळे ट्रोल होत आहे. अशा वेळी प्रिया गप्प बसलेली नाही. कपडय़ावरून माणसाची परीक्षा करू नका, असे सडेतोड उत्तर तिने ट्रोलर्सना दिले आहे.
❤️ Sunday morning special @Regrann from @saneshashank – Sunday Laughter session with @saietamhankar @priyabapat #sundayfunday #bestfriend #laugh #ilovemyjob
103.1k Likes, 591 Comments – Priya Bapat (@priyabapat) on Instagram: “❤️ Sunday morning special @Regrann from @saneshashank – Sunday Laughter session with…”
काही दिवसांपूर्वी प्रियाने सई ताम्हणकर हिच्यासोबतचा एका कार्यक्रमातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमधील प्रियाचा बोल्ड ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. मराठी अभिनेत्रीने कोणते कपडे परिधान केले पाहिजेत याचं भान तू ठेवायला हवं अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. त्यावर प्रियाने सडेतोड उत्तर दिलंय.

तिने लिहिलंय, प्रत्येकाला आपलं असं एक स्वतंत्र मत असतं हे मला माहीत आहे. सोशल मीडियावर तुम्हाला तुमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण कपडय़ांवरून तुमचा स्वभाव कसा आहे हे कोणी कसं काय ठरवू शकतं. मला ज्यांनी पाठिंबा दिला त्यांची मी आभारी आहे, पण ज्यांना माझा पेहराव आवडला नाही त्यांच्या मताचाही मी आदर करते. माणसाची प्रवृत्ती ही त्याच्या कपडय़ांवरून नाही तर वागणुकीतून दिसते. माझे कपडे ही माझी ओळख नाही. आपली प्रतिमा ही आपल्या वागणुकीने आणि कामाने तयार होते, आपण कोणते कपडे परिधान करतो याकरून नाही. तुम्हाला माझे कपडे आवडले नाही तरी हरकत नाही, पण त्यावरून माणसाची परीक्षा करणे मात्र चुकीचं आहे. या ट्रोलिंगमुळे मला वाईट काटत नाही, उलट माझी सहनशक्ती वाढते.































































