कौतुकाचा नारळ… प्रिया दत्त यांना सचिवपदावरून हटवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priya-dutt

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांच्या नावाची लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली असली तरी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरून त्यांना हटवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पदावरून हटवलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीच्या लेटरहेडवरून ही माहिती कळवली आहे. 26 सप्टेंबर रोजीच पत्र पाठवून त्यांना सचिवपदावरून हटवण्यात येत असल्याचं गेहलोत यांनी कळवलं होतं. यामध्ये संघटनेच्या सचिव म्हणून तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कौतुक केल्याचा देखील उल्लेख आहे. तसेच भविष्यात त्यांची पक्षाला गरज भासणार असल्याचंही म्हटलं आहे.

या घटनेनंतर येत्या निवडणुका लक्षात घेता आता काँग्रेसमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.