कृपया ट्रोल करू नका! 33 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत प्रियांका चोप्राची विनंती

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. केवळ हिंदुस्थानच नव्हे तर जगभरात तिचे चाहते आहेत. नुकतेच प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका बाजुला तिच्या बालपणीचा तर दुसऱ्या बाजुला किशोर वयातील फोटो आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या फोटोसोबत तिने भले मोठे कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनमध्ये सुरूवातीलाचं मी 9 वर्षांची असताना काढलेल्या फोटोला कुणीही ट्रोल करू नका असे सांगितले आहे. तारूण्य आणि ग्रुमिंग मुलीला काय करु शकते ते पाहा, असे लिहिले आहे. पुढे तिने तिच्या आयुष्यातील प्रवासाचे वर्णन करत आपल्यातील लहान मुलं अधून मधून वर डोकावत असल्याचे म्हटले आहे.

प्रियंकाने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये “डावीकडील फोटोमध्ये बॉय-कट मधील 9 वर्षांची मुलगी, जिला लांब केसांचा त्रास होऊ नये म्हणून बॉय कट करून शाळेत पाठवले जायचे. तर उजवीकडे 2000 साली मिस इंडिया जिंकल्यानंतर हेअर स्टाईल, मेकअप, आणि महाग कपड्यांच्या वैभवात दिसणारी 17 वर्षीय मी. दोन्ही फोटोंमध्ये 10 वर्षांपेक्षा कमी अंतर आहे. तरीही दोन्हीमध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळतो. आजचे मोलाचे क्षण पाहण्यासाठी तुम्ही श्रमातून गेले आहात, त्यामुळेच स्वत: वर प्रेम करा, असे प्रियंकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.