ऑस्कर सोहळ्यात घुमणार हिंदुस्थानच्या ‘देसी गर्ल’चा आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ अशी ओळख असलेली प्रियांका चोप्रा हॉलीवूडच्या प्रसिद्ध ऑस्कर सोहळ्यात दिसणार आहे. 98 व्या अकादमी अवॉर्ड्स ऑस्करच्या सादरकर्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात प्रियांका चोप्राचा समावेश आहे. शुक्रवारी अकादमीने अधिकृतपणे या नावाची घोषणा केली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सादरकर्त्यामध्ये प्रियांका दिसणार आहे. प्रियांकासोबत आयरन मॅन फेम रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आणि ऑस्कर विजेता ऐनी हैथवे यासारखी दिग्गज मंडळी दिसणार आहे.

यावर्षी ऑस्कर नॉमिनेशनची घोषणा 22 जानेवारी 2026 ला करण्यात आली होती. यावर्षी सर्वात जास्त नॉमिनेटेड चित्रपट सिनर्स ऑस्कर 2026 साठी सर्वात मोठा दावेदार आहे. सिनर्सने 24 कॅटेगरीत 16 नॉमिनेशन मिळवून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.