
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानातील ‘प्रो बास्केटबॉल लीग’ चा शुभारंभ झाला असुन ९ जुन ते २३ ऑगस्ट पर्यांत ही लीग खेळी जाणार आहे. प्रो बास्केटबॉल लीग हिंदुस्थानातली पहिल्या ‘फिबा (इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन) प्रमाणित’ लीगतर्फे प्रारंभिक मोसमासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातून तब्बल १०० हून अधिक खेळाडूंना प्रो-बास्केटबॉलचे स्वप्न सत्यात उतरविण्याची संधी मिळाली . या लीग द्वारे बास्केटबॉल खेळाला हिंदुस्थानात उत्तम दर्जा मिळावा या साठी प्रो बास्केटबॉल लीग प्रयत्न करत आहेत.
प्रो बास्केटबॉल लीगचे आयुक्त रोहित बक्षी यांनी असं सांगितले की या स्पर्धेत विजेत्या संघाला हिंदुस्थानाचं इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशनच्या जागतिक दौऱ्यामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
हिंदुस्थानी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी करेल असा विश्वासबी बक्षी यांनी व्यक्त केला आहे. प्रो बास्केटबॉल लीगच्या पहिल्या मोसमात पलप्रीत सिंग ब्रार सारखे ,बिक्रमजीत गिल, इंदरबीर सिंग गिल, लियान्ड्रो लिमा यांच्यासारखे देशी आणि विदेशी खेळाडू खेळणार आहेत.



























































