
क्रिकेट, कबड्डी, हॉकी, फुटबॉल पाठोपाठ आता प्रो रोल बॉलचाही थरार लवकरच अनुभवायला मिळणार आहे. आज प्रो रोल बॉल-इंडियाज प्रीमियर हाय-स्पीड लीगच्या बहुप्रतीक्षित सीझन-1 मध्ये सहभागी होणाऱया आठ संघांचे लोगो आणि जर्सीचे अनावरण करण्यात आले.
प्रो रोल बॉल ही रोल बॉल या स्वदेशी खेळासाठी जागतिक स्तरावर चालणारी पहिली आंतरराष्ट्रीय लीग ठरणार आहे. 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत 17 देशांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू 15 दिवसांच्या लिलावामध्ये सहभागी होणार आहेत. याप्रसंगी एक आयोजित पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचे यजमान आणि युगा स्पोर्ट्स अॅण्ड एंटरटेन्मेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मेहता उपस्थित होते. रोमांचक कार्यक्रमादरम्यान आठ फ्रँचायझी मालक त्यांच्या संबंधित संघांचे लोगो असलेले टी-शर्ट घालून एका मंचावर गेले. त्यानंतर दिवसभरात लिलाव प्रक्रिया झाली. जिथे संघ त्यांच्या पसंतीच्या खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली. प्रो रोल बॉल लिलावासाठी पात्र ठरलेले सर्व राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूदेखील उपस्थित होते.



























































