
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हयात गेल्या चोवीस तासात ७.२२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जुन ते आतापर्यंत ५७०.०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण शिवाजीनगर येथे एकदंत अपार्टमेंटची सरंक्षण भिंत पावसामुळे कोसळल्याने ७ लाख ६० रुपयांचे अंशत: नुकसान झाले तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आकडे मिलीमीटर मध्ये आहेत. मंडणगड- ०५.००, दापोली- ०२.००, खेड- ०६.००, चिपळूण-०७.००, रत्नागिरी – २४.००, लांजा ०३.०० आणि राजापूर तालुक्यात १८.०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यात पावसाची नोंद निरंक आहे.
२० जून २०१८ रोजी सकाळी १० वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार चिपळूण तालुक्यात मौजे शिवाजीनगर येथै सुरेंद्र महादेव कदम यांच्या घराचे पावसामुळे ५७ हजार ४०० रुपयांचे , मौजे शिवाजीनगर येथे एकदंत अपार्टमेंटची सरंक्षण भिंत पावसामुळे कोसळल्याने ७ लाख ६० रुपयांचे अंशत: नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
जनतेला सावधानता व सुरक्षितेचा इशारा
हवामान खाते, कुलाबा मुंबई यांचेकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या ईमेल संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २० जुन २०१८ ते २४ जुन २०१८ रोजी या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
































































