SC/ST कायद्यातील बदलाला विरोध, ठाण्यातही सवर्णांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मोदी सरकारने SC/ST कायद्यात बदल केला होता. या बदलाला दलित संघटनांनी विरोध केल्याने हा बदल मागे घ्यावा लागला होता. या निर्णयाच्याविरोधात सवर्णांच्या संघटनांनी उत्तरेकडील राज्यांमध्ये बंद पुकारला आहे.


बिहार आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात या बंदचा प्रभाव जास्त असल्याचं दिसून येतंय.

बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलं तर उत्तर प्रदेशातील आग्रा-ग्वाल्हेर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातही या आंदोललाना सुरुवात झाली असून ठाण्यातील नवघर भागात आरक्षणाच्या विरोधात सवर्ण बचाओ अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात रेल्वे रोको आंदोलनही करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १८ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये ३५ संघटना सहभागी झाल्या आहेत.

आर्थिक निकषावर सवर्णांना आरक्षण द्या! रामदास आठवले