नगर शहर शिवसेनेच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याचा दिल्लीगेट येथे निषेध; निदर्शने करून सह्यांची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी महाराष्ट्राबाबत वक्तव्य केले त्याचा पूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. नगरमध्ये शहर शिवसेनेच्या वतीने दिल्लीगेट येथे रविवारी भर पावसात आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड ,माजी महापौर भगवान फुलसौंदर ,अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, सचिन शिंदे , शाम नळकांडे , प्रशांत गायकवाड ,संतोष गेणपा, दीपक खेरे ,महिला आघाडीच्या अरुणा गोयल ,रावजी नांगरे, संदीप दातरंगे, अरुण झेंडे, बंटी खेरे ,संतोष तनपुरे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच नागरिकांसाठी सह्यांची मोहीमदेखील राबविण्यात आली. यावेळी बोलताना संभाजी कदम म्हणाले की, राज्यपाल हे पद अतिमहत्वाचे आहे. परंतु त्या पदावर बसलेली व्यक्ती कायम वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आली आहे, तेव्हा आम्ही केंद्र सरकार ला विनंती करतो की त्यांना पुन्हा तुम्ही दिल्लीला बोलावून घ्यावे. फक्त शिवसेनाच नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिक त्या वक्तव्याचा निषेध करत आहे, असे ते म्हणाले .