
सामना प्रतिनिधी । आष्टी
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आष्टीमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला. नागरिकांनी शहरातील शनि चौकात शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. हिंदुस्थानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याने हिंदुस्थानात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
आष्टी शहरातील नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद, “अमर रहे, अमर रहे शहिद जवान अमर रहे,” “भारत माता की जय”, वंदे मातरम अशा घोषणा देत निषेध केला. यावेळी आमदार भिमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, नियमत बेग, डॉ मधुकर हबंर्डे, आण्णासाहेब चौधरी, संजय मेहेर, अॅड. रत्नदिप निकाळजे, डॉ विलास सोनवणे यांच्यासह व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.






























































