ऐकावं ते नवलच! पोलिसांनी दोन भुतांविरोधात नोंदवली तक्रार, गुजरातमधील विचित्र घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक व्यक्ती धावत धावत घाबरलेल्या अवस्थेत पोहोचला आणि आपल्याला भुतांनी धरल्याचे सांगितले. या व्यक्तीने दोन भुंताविरोधात तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील पंचमहल भागात सुरेश (नाव बदलेले)  हा 35 वर्षीय व्यक्ती शेतात काम करत होता. तेव्हा त्याला दोन भूत दिसले. भूत पाहताचा या सुरेशने तिथून पळ काढला. तरी दोन भुतांनी त्याला पकडले, सुरेशने भुतांपासून कशीबशी आपली सुटका केली आणि थेट पोलीस स्थानकात धाव घेतली.

पोलीस स्थानकात आल्यावर सुरेश भितीने थरथर कापत होता. त्याचा जीव घाबरा झाला होता. आपल्याला भुतांनी पकडले होते, पण त्यांच्याकडून आपण सुटका केली असे सुरेशने पोलिसांना सांगितले. तसेच पोलिसांकडे या दोन भुतांची तक्रारही केली.

पोलिसांनी त्या व्यक्तीला धीर देण्यासाठी त्याची सर्व कहाणी ऐकून घेतली. त्याला शांत  करण्यासाठी त्याची तक्रारही नोंदवून घेतली. पोलिसांनी सुरेशबाबत चौकशी केली असत तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले. अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या १० दिवसांपासून त्याने औषधं घेतली नव्हती. पोलीस भुतांपासून आपला जीव वाचवतील असा विश्वास सुरेशला होता. म्हणून पोलिसांनी त्याला धीर देत त्याची भिती दूर केली. तसेच वेळोवेळी औषधं घेण्याचे त्याच्याकडून कबुल करून घेतले.