‘पीटीआय’ने 297 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था असलेल्या ‘पीटीआय’मधून तब्बल 297 पत्रकारेतर परमनंट कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने निलंबित केले. यात मुंबई पीटीआय ऑफिसमधील 40 कर्मचारी आहेत. या निलंबनाच्या विरोधात हे कर्मचारी उद्या सोमवारी 1 ऑक्टोबरपासून डी.एन. रोड, युको बँक बिल्डिंग, हुतात्मा चौकाजवळ सकाळी 10 ते सायंकाळी 6पर्यंत रोज जोरदार धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती पीटीआय एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस सागर भुरके यांनी दिली.

दरम्यान, याचा तीव्र निषेध नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टने केला आहे. निलंबनाची व्यवस्थापनाची ही कृती बेकायदेशीर आणि आततायीपणाने केलेली आहे. तसेच परमनंट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कृती ही मजिथिया वेतन बोर्डच्या विरोधात आहे, असे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टने म्हटले आहे.