पुलकित सम्राट ‘मेड इन हेवन 2’मध्ये

‘मेड इन हेवन 2’चा ट्रेलर लाँच झाला आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या सीरिजच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. दुसऱ्या सीझनमध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जिम सरभ आणि कल्की कोचलिन यांच्यासह अभिनेता पुलकित सम्राटदेखील झळकणार आहे. ‘मेड इन हेवन’ च्या पहिल्या सीझनमधील एका भागामध्ये पुलकित सम्राटने एका सेलिब्रेटीची भूमिका साकारली होती. एका हटके ट्विस्टमध्ये तो दिसला होता. सीझन-2 मध्ये आता पुलकित कोणती भूमिका साकारणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.