पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजाची गोळ्या घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा येथे 2019 मध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अल बद्र या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर हमजा बुरहानची पाकव्याप्त काश्मीरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हमजाचे खरे नाव अरजूमंद गुलजार डार असे आहे, परंतु त्याला हमजा बुरहान म्हणून ओळखले जात होते. त्याला 2022 मध्ये हिंदुस्थानने दहशतवादी घोषित केले होते.

हमजा बुरहान हा पाकव्याप्त काश्मीरमधील आपल्या कार्यालयात बसला होता. त्या वेळी या ठिकाणी काही लोक पोहोचले आणि त्यांनी हमजावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे.