पुलवामा हल्ल्याशी संबंध श्रीनगरमध्ये बाप-बेटीला अटक

189

गेल्या वर्षी कश्मीर खोऱयातील सीमा सुरक्षा बलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला चढवून 40 सीआरपीएफ जवानांची हत्या घडवण्यात आली होती. या हल्ल्याशी संबंध असल्याच्या आरोपाखाली मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) श्रीनगरच्या बाप -बेटीच्या जोडीला अटक केली आहे. पीर तारिक असे बापाचे नाव असून इन्शा असे आरोपी मुलीचे नाव आहे. या दोघांवर पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश ए मोहमदचा दहशतवादी आदिल अहमद दार याला मदत केल्याचा आरोप एनआयएने ठेवला आहे. दहशतवाद समर्थक या बाप आणि मुलीला जम्मूला हलवण्यात आले असून त्यांची तेथे कोठडीत कसून चौकशी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या