पुण्यात 15 लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

नाशिकमधून टेम्पोतून गांजा घेऊन विक्रीसाठी पुण्यात आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्यांच्याकडून 14 लाख 35 हजारांचा 72 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याशिवाय टेम्पो मिळून 32 लाख 35 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्रविण बाळासाहेब वायसे (31) आणि योगेश शशिकांत महाजन (25, दोघेही रा. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना वाघोली लोहगाव रस्त्यावर एका टेम्पोतून दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडील टेम्पोत 14 लाख 35 हजारांचा 72 किलो गांजा मिळून आला. त्यांच्याविरूद्ध लोणीकंद पोलास ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण हे करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड ,संदिप शेळके, महेश साळुंखे,युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली आहे.

नाशिकमधून टेम्पोतून दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी पुण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने वाघोली लोहगाव रस्त्यावर सापळा रचून टेम्पोतील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 71 किलो 800 ग्रॅम गांजा मिळून आला आहे.
प्रकाश खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक दोन

आपली प्रतिक्रिया द्या