ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक सुसाईड नोट सोडून झाले बेपत्ता

व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर (वय 64) हे मोटार चालकाकडे सुसाईड नोट ठेवून बेपत्ता झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ते मॉडेल कॉलनी येथून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आटोमोबाईल क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या पाषाणकर ग्रुपचे गौतम पाषाणकर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते बांधकाम व्यवसायिकही आहेत. त्यांना व्यवसायात आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे गौतम पाषाणकर यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या मोटार चालकाला एक लिफाफा ताब्यात देऊन घरी देण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी चालकाला तुझे काही काम असेल तर करून ये असे सांगत मी पायी घरी येतो असे सांगितले. त्यानुसार चालकाने तो लिफाफा घरी दिला. पाषाणकर कुटुंबियांनी तो लिफाफा उघडून पहिला असता त्यात गौतम यांनी व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे, असे शिवाजीनगर पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या