चंदनगर बसस्थानकात तरूणाला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदननगर बस स्थानक परिसरात आलेल्या तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गुरव (वय २०, रा. चंदननगर) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हे पुणे-नगर रस्त्यावरून पायी जात होते. चंदननगर बसस्टॉप येथे दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी त्यांना अडविले. त्यांना धमकावून त्यांच्या खिशातील ५०० रुपये काढून नेले. त्यानंतर दोघेजण खराडीच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी चंदननगर पोलिस अधिक तपास करत आहेत.