
लग्नामध्ये सात फेरे घेतल्यानंतर एकमेकांबरोबर जगण्याच्या आणाभाका घेतलेल्या जोडप्याच्या संसाराची घडी जेमतेम वर्षभरातच विस्कटली. वेगवेगळ्या देशांमध्ये नोकरी करणाऱया पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांचा विवाह जुळविणाऱ्या आयांनाच मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) घेऊन आपल्या पाल्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाने पती-पत्नीशी संवाद साधून त्यांचा निर्णय ऐच्छिक असल्याची खातरजमा करून सहा महिन्यांचा फेरविचार कालावधी रद्द करून घटस्फोट मंजूर केला.


























































