
मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. प्रणित उर्फ पन्या राजेश रंगारी (वय 24 ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सिंहगड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी प्रणित उर्फ पन्या वडगाव परिसरातील नवले ब्रीजजवळ येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार श्रीकांत दगडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, एपीआय जुबेर मुजावर, शाहिद शेख, गणेश पाटोळे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप यांच्या पथकाने केली.




























































