क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून तरूणाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

फोनवर मोठ्याने बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तिघांनी क्राईमब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून एकाला जबर मारहाण केल्याची घटना वानवडीत घडली आहेत. याप्रकरणी तिघांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश मोहन, जोनस रिचर्ड (रा. जगताप चौक) आणि माईकल भाई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भारत पंजाबी (40, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

भारत पंजाबी यांचा श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय आहे. आरोपी 15 जानेवारीला वानवडी सर्कलमधील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी फोनवर जोरात बोलण्यावरून भारत आणि आरोपी यांच्यात वाद झाले. वादाचे पर्यवसन भांडणात झाले. याच भांडणातून आरोपींनी फिर्यादींना आम्ही क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगत मारहाण केली. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक सुधा चौधरी तपास करत आहेत.