घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक; 13 लाखांचा ऐवज जप्त, गुन्हे शाखेची कामगिरी

शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने अटक केले. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने मिळून तब्बल 13 लाख 7 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. रफिक हुसेन शेख (वय 27, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत घरफोड्या करणारा रफिक शेख सर्पउद्यान परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई गजानन शिपाई गजानन सोनुने यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने सहकारनगर, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, सिंहगड, वाकड, दिघी, कोंढवा परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याशिवाय वाहनचोरीचा एक गुन्हा मिळून 13 गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून 228 ग्रॅम सोने आणि 1 किलो 405 ग्रॅम चांदी असा मिळून 12 लाख 68 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, यशवंत आंब्रे, किशोर वग्गू, आस्लम खान पठाण, चेतन गोरे, गजानन सोनुने, निखील जाधव, समीर पटेल, कादीर शेख, चंद्रकांत महाजन, विवेक जाधव, अजित फरांदे, उत्तम तारू, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या