पुणे – कोरोना झाल्याचे म्हणत सहाजणांकडून अपंग वकिलाला धक्काबुक्की

crime

कोरोना झाल्यामुळे सहाजणांनी एका अपंग वकिलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना विश्रांतवाडीत घडली आहे. याप्रकरणी बळीराम मोरे, त्यांची पत्नी, मुलगा, सचिन शिंदे, गणेश खोपकर, उमेश खोपकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकील असून विश्रांतवाडीतील भैरवनगर येथील एका सोसायटीत राहण्यास आहेत. काही दिवसांपुर्वी फिर्यादी घरी असताना मोरे यांनी त्यांना खाली बोलावून घेतले.

तुझ्या कुटुंबाला कोरोना झाला आहे, असे म्हणत कोरोनामुळे तूझ्या घरातील मरतीलच पण तुझ्यामुळे आम्हाला का मारतो, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी हे अपंग असताना त्यांना ढकलून देत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. हा प्रकार 29 सप्टेंबर रोजी घडला असून फिर्यादी यांच्या घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यामुळे ते बरे झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या