
मंचरमध्ये ओम ट्रेडिंग कंपनी आणि सविता स्टोअर्समध्ये विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 56 हजार 800 रूपयांचे 379 विदेशी सिगारेटचे बॉक्स जप्त करण्यात आले.
गणेश सावळेराम पोखरकर (वय 36, रा. पिंपळगाव, खडकी, आंबेगाव) आणि घिसाराम मुळाराम सोळंकी (वय 28, रा. संभाजी चौक, मंचर) अशी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस आणि मुंबईतील सामाजिक संस्था वुई केअर फाउंडेशनच्यावतीने दुकानांमध्ये संयुक्तरित्या छापा टाकण्यात आला.
मंचरमधील दुकानांमध्ये विदेशी सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सामाजिक संस्थेच्या मदतीने गणेश पोखरकर आणि घिसाराम सोळंकी यांच्या दुकानांमध्ये छापा टाकून 379 विदेशी सिगारेट जप्त केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खबाले तपास करीत आहेत.



























































