
शहरातील मध्यवर्ती गणेश पेठेत असलेल्या डुल्या मारूती देवस्थान मंदीरातील श्री विठ्ठल रखुमाईच्या दानपेटीतून चोरट्यांनी 1 हजार 280 रूपयांची रोकड चोरून नेली आहे. त्यामुळे मंदीरातील दानपेट्याही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपुर्वी मंडईतील श्री शारदा गजानन मंदीरातून चोरट्याने दागिन्यांची चोरी केली होती. त्यानंतर काल पुन्हा गणेशपेठेतील मंदीरातून दानपेटीतील रोकड चोरून नेल्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.
गणेशपेठेत डुल्या मारूती देवस्थान मंदीरातील श्री विठ्ठल रखुमाई समोर दानपेटी ठेवण्यात आली आहे. चोरट्याने दर्शनाचा बहाणा करून दानपेटीतील 1 हजार 250 रूपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

























































