
जुन्या भांडणाच्या रागातून तरूणावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. आतिष, विकी तुपसुंदर, यश होळकर, अब्बु शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रमेश कलाल (रा. नानापेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
तरूणावर जीवघेणा हल्ला करणारे सराईत आरोपी शिवाजीनगर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या पथकाने केली.



























































