जुन्या भांडणातून केला जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी तरूणाच्या डोक्यात दगड मारून आणि रॉडने बेदम मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. ही घटना 30 ऑगस्टला संध्याकाळी सातच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील इंदिरानगर चौकात घडली.

सागर संदीप गुडेकर (22) आणि सागर सुरेश पाटोळे (वय 23 दोघेही रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अब्दुल हमीद शमशुद्दीन शेख (वय 35 रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी उल्फत शेख  (32) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अब्दुल आणि सागर यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होते. त्याच रागातून सागरने साथीदाराला बोलावून घेत अब्दुलला रॉडने मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करीत आहेत.