Pune crime news कंबरेला पिस्तूल लावून फिरणारे दोघे जेरबंद

बेकायदेशीररित्या गावठी कट्टा जवळ बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पिस्तूलासह जेरबंद करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले. आरोपींच्या ताब्यातून पिस्तूल, एक काडतूस जप्त करण्यात आले आहे.

आकाश उद्धव कोपनर (वय – 21, रा. कात्रज, मूळ. रा. नगर) आणि सनी विनोद मेहरा (वय – 26, रा. कात्रज, मूळ. रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बिबवेवाडी पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर असताना गंगाधाम रस्ता परिसरात दोघेजण दुचाकीवरून फिरत असून त्यातील एकाच्या कंबरेला पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच, आरोपी हे गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. यानूसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यातील कोपनर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदिंलग यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.