पुण्यात दुचाकींसह मोबाईल चोरणाऱ्या सराईतांना बेड्या, 7 दुचाकींसह 10 मोबाईल जप्त

पुणे शहरातील विविध भागातून दुचाकींसह मोबाइल चोरणाऱ्या सराईतांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात दुचाकी, 10 मोबाईल, दोन लॅपटॉप, आयपॅड असा पावणेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला .

यश सागर ओंबळे (वय – 21, रा. यशवंत नगर, येरवडा) आणि पृथ्वीसिंग नारंगसिंग गिल (वय – 24, रा. येरवडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय रामदास जाधव (वय – 25, रा. कोंढवा बुद्रूक) यांनी तक्रार दिली आहे.

अक्षयने घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी पोलीस तपास करीत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भोसले आणि सुजित मदन यांना दुचाकीस्वार चोरट्यांची माहिती मिळाली. पोलिसांनी यश आणि पृथ्वीसिंग यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे सांगत 15 गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, सतिश चव्हाण, जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सागर भोसले सुजित मदन यांनी केली.

”शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईतांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 गुन्हे उघडकीस आणून सात दुचाकी, 10 मोबाईल जप्त केले आहेत.”

सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे