जमिनीच्या वादातून काकाचा काटा काढला

जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून काकाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नवी पेठ येथे घडली आहे. विनोद पुसाळकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन पेठ येथे राहणारे विनोद पुसाळकर आणि त्यांचा पुतण्या नितीन पुसाळकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता. यावरून दोघांमध्ये सतत खटके उडायचे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पुतण्या नितीन याने काकाच्या चेहऱ्यावार धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भाचा नंदकुमार पाटील याच्या तक्रारीवरून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.