पुणे – खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

खरेदी केलेल्या वाड्यात राहायचे असल्यास 10 लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी मागणार्‍या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली.

मोहम्मद अली मेहदी गंजी आणि अली अकबर मेहदी गंजी अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. अब्बास गंजी याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर सलीम मुजावर (वय 34, रा. गुरूवारपेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, फिर्यादी समीर मुजावर यांनी गुरूवार पेठेतील वाडा विकत घेतला आहे. ते आपल्या मित्रासोबत वाड्याची साफसफाई करत होते. त्यावेळी शनिवारी तीन आरोपी तेथे गेले. त्यांनी फिर्यादी समीरला येथे रहायचे असेल तर 10 लाख रूपये द्यावे लागतील, नाहीत हात पाय तोडून ठेऊ अशी धमकी दिली. तु आमचे काहीही करू शकत नाही, आमची पोलिसांमध्ये वरपर्यंत ओळख आहे अशी धमकी दिली. 10 लाख न दिल्यास खल्लास करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.