सिमकार्ड उपडेट करणे पडले महाग, ऑनलाईन दीड लाखांना गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाइल कंपनीचे सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून दीड लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार खासगी कंपनीत कामाला असून काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यान त्यांना मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत न केल्यास सीमकार्ड बंद पडेल, अशी बतावणी केली. त्यानंतर सीमकार्डची माहिती अपडेट करण्याच्या बहाण्याने चोरट्याने त्यांच्या बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल क्रमांक आणि खात्याची गोपनीय माहिती घेतली. चोरट्याने त्यांच्या खात्यातून 1 लाख 49 हजार रुपयांची रोकड लांबविली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष काळे तपास करत आहेत. सायबर चोरट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून तसेच बतावणी करून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत.