दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक, बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मंगेश दगडू गवळी, आकाश श्रावण चव्हाण (दोघे रा. हिंजवडी), आदिनाथ चंद्रकांत पांचाळ (रा. जळकोट, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

बिबवेवाडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकी चोरट्यांबाबतची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बिबवेवाडी व पिंपरी परिसरातून 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नव्र् नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, शाम लोहोमकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, अमोल शितोळे, राहूल कोठावळे, अतुल महांगडे, श्रीकांत कुलकर्णी यांच्या पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या