पुणे – शहरात वाहनचोरांचा धुडगूस, एकाच दिवशी 6 दुचाकी चोरीला

589

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चोरट्यांनी शहरातील विविध भागात धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे. ऑनलाईन फसवणूकीसह घरफोड्यानंतर आता वाहन चोरांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल चतुःश्रृंगी, हडपसर, बिबवेवाडी, येरवडा, खडक आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 6 दुचाकी चोरुन नेल्या आहेत.

नागरिकांनी बालेवाडीगाव, हडपसर परिसरातील संजीवणी हॉस्पीटलच्या मागे, येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, भवानी पेठेतील म्हसोबा मंदीरा शेजारी सारनाथ बुध्द विहाराशेजारी सार्वजनिक रस्त्यावर तसेच आंबेगाव बुद्रक येथे दुचाकी पार्क केल्या होत्या. चोरट्यांनी परिसरातील रेकी करुन दुचाकी चोरुन नेल्या आहेत. त्याशिवाय बिबवेवाडी येथील चिंतामणी हॉस्पीटलजवळ पार्क केलेल्या मोटारीतून चोरट्यांनी अ‍ॅम्प्लीफायर चोरुन नेला आहे.

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करावे की नाही, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या