गाडीचा धक्का लागल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. 14 फेब्रुवारीलर शिवनेरीनगरमध्ये ही घटना घडली. रिहान कुरेशी (वय 20) आणि अरबाज मलंग कुरेशी (दोघेही रा.शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या आणखी दोघां साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैद फव्रुâद्दीन कोंडा (वय 18) याने फिर्याद दिली आहे.

जैद 14 फेब्रुवारीला रात्री शिवनेरी नगर गल्ली नंबर सात येथून दुचाकीवर जात होते. त्यावेळी त्याच्या दुचाकीचा एका अनोळखी मुलाला धक्का लागला. याच कारणावरून आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी जैदला बेदम मारहाण केली. पट्टयाने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. यामध्ये जैदच्या डोक्याला दुखापत झाली आहे.