
महावितरणच्या सेल्फ मीटर रीडिंगला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्यात जवळपास 12 लाख 47 हजार घरगुती ग्राहकांनी आपल्या स्वतःच्या वीज वापराचे रिडींग महावितरणकडे नोंदवले आहे. यामध्ये पुणे विभाग आघाडीवर असून सुमारे साडेचार लाख ग्राहकांनी मोबाईल अप्लिकेशनच्या मदतीने मीटर रिडींग निंदवले असून त्याखालोखाल भांडुप विभागातील 3 लाख 78 हजार ग्राहकांनी रिंडिंग नोंदवले आहे.
लॉकडाऊनमध्ये कंनटेन्मेंट झोनमधील वीज ग्राहकांचे मीटर रिडींग घेणे महावितरणला शक्य नाही. त्यामुळे ग्राहकांनी स्वतः मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या वीज वापराचे मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणने केले होते. मेमध्ये केवळ 9 लाख ग्राहकांनी आपले रिडींग नोंदवले होते. मात्र जुलैमध्ये त्यामध्ये वाढ झाली असून साडे बारा लाख ग्राहकांनी आपले मीटर रिडींग नोंदवले आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना अचूक वीज बिले मिळणार आहेत.



























































