
तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या सराईताला पुणे पोलिसांनी अटक केले. सुशांत उर्फ मटया शशीकांत कुचेकर ( वय 27, रा. नानापेठ, मूळ-रा. नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी सराईत गुन्हेगारांसह तडीपार आरोपींची माहिती घेत होते. त्यावेळी तडीपार सराईत गुन्हेगार भवानी पेठेत आल्याची माहिती पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना मिळाली.
तपास पथकाने सापळा रचून तडीपार सुशांतला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कोणाचीही परवानगी न घेता शहरात प्रवेश केल्याची कबुली दिली. डिसेंबर 2019 पासुन त्याला दोन वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालयासह जिल्हयातुन तडिपार करण्यात आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सुमित खुट्टे, विठ्ठल चोरमले, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, सुनिल हासबे, नितीन घोसाळकर, श्याम सुर्यवंशी, वनिता गोरे यांनी केली.






























































