
पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर हॉटेल कपिलाजवळ सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान स्लॅब कोसळून दोन जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. त्यापैकी एकाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले असून दुसऱ्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या व्यक्तीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अडकलेला व्यक्ती अद्यापही ढिगाऱ्याखाली असून त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.































































