पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपूलावर अपघात; दोघेजण जागीच ठार

उड्डाणपूलाच्या कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या भिषण अपघातात दोन तरुणांचा जगीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री 11 वाजता घडली. सलीम कोकरे (वय 24 वारजे गावठाण) आणि शंकर अंकुश इंगळे (वय 22 रामनगर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास समील व शंकर दुचाकीवर वारजेकडून कोथरुडच्या दिशेने जात होते. त्यावेळी कर्वेनगर येथील उड्डाणपूलाच्या कठड्याला त्यांची दुचाकी जोरात धडकली. त्यामुळे दोघे गंभीर जखमी होऊन ठार झाले. दरम्यान, दुचाकी घसरल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कर्वेनगर पोलिस चौकीच्या समोरील बाजूला घटना घडल्याने तत्काळ पोलिसांनी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या