10 लाखाच्या खंडणीसाठी दोन जणांचे अपहरण, चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

अपहरण झालेल्या व्यक्तीची 47 तासांत सुटका करताना चार आरोपींना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले. संबंधित प्रकरणात 10 लाखांच्या खंडणीसाठी दोघांचे अपहरण करण्यात आले होते. कोपरगाव येथील श्रीकृष्ण बबनराव पवार व अक्रम शफिओददीन शेख या दोघांचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी सचिन राजेंद्र कुसुंदर, सचिन संजय साळवे, आकाश विजय डाके, शुभम केशव राखपसारे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गांधी पुतळा परिसरातील बाल गणेश किड्स वेअरचे मालक व दुकानात कामाला असलेल्या कामगाराचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार एम एच 12 एन बी 2482 या कार मधून वरील आरोपींनी कृष्णा पवार व शाफिक उद्दीन शेख यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना शिर्डी येथील हॉटेलमध्ये दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली. आरोपीनी अनिल पवार यांच्या मोबाईल वर फोन करुन अर्जट सचिन सावजी याच्या घरी 10 लाख रुपये पोहच कर, तू जर पैसे दिले नाही, तर सचिन आत्महत्या करील असे बोलण्यास भाग पाडले. श्रीकृष्ण बबनराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदरचा कोपरगाव शहर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बोरसे पुढील तपास करीत आहे.