पुणे – विनाकारण भटकंती भोवली, तब्बल 4 हजार 700 जणांविरुद्ध कारवाई

722

शहरात लॉकडाऊन कालावधीत भटकंती करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. काल पहाटे पाच वाजेपसून आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांनी तब्बल 4 हजार 700 जणांविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये सर्वाधिक 2 हजार 634 विनाकारण संचार करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. तर विनामास्क 2 हजार 75 जणांना कारवाइचा दणका देण्यात आला.

कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शहरात लॉकडाऊन राबविण्याताना कडक कारवाई करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. त्यानुसार चौका चौकात नाकाबंदी करून वाहन चालकांसह नागरिकांची विचारपूस केली जात आहे. त्यानुसार विनाकारण प्रवास करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात मागील 36 तासात पोलिसांनी विनामस्क आणि संचार करणाऱ्यांना टार्गेट केले होते. त्यानुसार पोलिसांनी 805 वाहने जप्त केली असून विविध भागात 710 वाहन चालकांविरुध कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या