पुणे – खिडकीचे गज कापून साडेचार लाखांचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कपाटातील तब्बल साडेचार लाख रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना 12 एप्रिलला मध्यरात्री अडीचच्या सुमारास मांजरी बुद्रुक परिसरातील आशा बंगल्यात घडली.

याप्रकरणी प्रशांत जगताप वय 35 रा. मांजरी बु्रद्रूक यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे कुटूंबियासह मांजरीतील मोरे वस्तीवर राहायला आहेत. 12 एप्रिलला ते कुटुंबियासह घराच्या छतावर झोपले होते. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील साडेचार लाखांचे दागिने चोरून नेले. प्रशात हे सकाळी खाली आले असता, त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.